प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संशयितांची स्वॅब तपासणी वाढविण्यात आली आहे. प्रशासनाला आणखी 442 संशयितांच्या तपासणी अहवालांची प्रतीक्षा असून तीन-चार दिवसांत हे अहवाल उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. यावेळी रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने शनिवारी रात्री जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार जिल्हय़ातील 9322 जणांच्या आरोग्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले असून 1519 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. परराज्यातून येणाऱयांची संख्या वाढल्यामुळे साहजिकच क्वारंटाईनची संख्या वाढत चालली आहे.
शनिवारी शिवपेठ (ता. रामदुर्ग) येथील एका गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 121 वर पोहोचली असून आतापर्यंत कोरोनामुळे हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या 70 जणांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आणखी 58 बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील एकूण 8026 जणांचे स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 7327 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 121 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आणखी 442 जणांच्या अहवालांची प्रशासनाला प्रतीक्षा आहे.
48 तासात 2 चाचण्या
कोरोना रुग्णावर 14 दिवस उपचार केल्यानंतर 48 तासांत दोनवेळा त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. 14 दिवसानंतरच्या 24 तासात एक व त्यानंतरच्या 24 तासांत दुसऱयांदा घशाचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात येते. हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यावर रुग्णाला घरी पाठविण्यात येते, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. शहरातील वेगवेगळी विद्यार्थीं वसतीगृहे व लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्यांचे स्वॅब त्या त्या ठिकाणी काढण्यात येत आहे.