वैद्यकीय, कायदा, बोटिंगचेही प्रशिक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर येथून प्रशिक्षणासाठी बेळगावमध्ये आलेल्या केएसआरपी हवालदाराला अग्निशमन विभागाने प्रशिक्षण दिले.
आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी, एखादी व्यक्ती बुडत असेल तर त्यांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थींना देण्यात आले. बेळगावचे ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर व त्यांच्या टीमने प्रशिक्षण दिले.
केएसआरपी हवालदारांना वैद्यकीय, कायदा, अग्निशमन अशा विविध विभागांची प्राथमिक माहिती करून देण्यात येते. राज्य आपत्ती निवारण पथक (एसडीआरएफ) यांच्या सहकार्यातून अग्निशमन प्रशिक्षण गोवावेस येथील कार्यालयात देण्यात आले. तर किल्ला तलाव येथे बोटींगचे प्रशिक्षण देण्यात आले.