राज्यातील 19 पोलिसांना राष्ट्रपती प्रशंसनिय सेवा पदकाची घोषणा
प्रतिनिधी / बेंगळूर
प्रजासत्ताक दिनी देण्यात येणाऱया राष्ट्रपती पदकासाठी राज्यातील 19 पोलिसांची निवड झाली आहे. त्यामध्ये बेळगाव उत्तर विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक दलाचे (ऍन्टी करप्शन ब्युरो-एसीबी) प्रमुख बी. एस. न्यामगौडा यांचाही समावेश आहे. पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात येणार आहे.
देशभरातून 946 जणांना यंदा राष्ट्रपती पदक देण्यात येत आहे. त्यापैकी 89 जणांची विशिष्ट सेवा पदक तर 205 जणांची राष्ट्रपती प्रशंसनिय पदकासाठी निवड झाली आहे. या दोन्ही पदकांसाठी कर्नाटकातून 19 जणांची निवड झाली आहे. तर राज्य अग्निशामक दलातील 7 जणांची निवड झाली आहे.
राज्य गुप्तचर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुब्रह्मण्येश्वरराव अय्यंकी, बेळगाव उत्तर विभागाचे एसीबीचे प्रमुख बाबुसाब शिवगौडा न्यामगौडा, बेंगळूरमधील सीआयडीच्या आर्थिक गुन्हे विभागाचे डीवायएसपी बसवण्णप्पा रामचंद्र, बेंगळूर रेल्वे विभागाचे डीवायएसपी डी. अशोक, बेंगळूर शहर विकास प्राधिकरणाऱया विशेष कृतीदलाचे डीवायएसपी सी. बालकृष्ण, बेंगळूरमधील पोलीस मुख्यालयातील गुन्हे विभागाचे डीवायएसपी व्ही. के. वासुदेव, चित्रदुर्ग ग्रामीण पोसीस स्थानकाचे मंडल पोलीस निरीक्षक भालचंद्र नायक यांना राष्ट्रपती प्रशंसनिय सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
तर बेंगळूर गुप्तचर विभागाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होन्नगंगय्या ईश्वरय्या, उडुपीचे डीसीआरबीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश, चामराजनगर जिल्हा महिला पोलीस स्थानकाचे निरीक्षक बसवय्या पुट्टस्वामी, केएसआरबीच्या तिसऱया बटालियनचे विशेष साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेंकटेश चौथ्या बटालियनचे विशेष साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहनराज कुरडगी आणि वेंकटस्वामी चिन्नप्पा, गुप्तचर विभागाचे विशेष साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकुमार, कोडगू जिल्हा डीएआरचे जितेंद्र कुडुकडी राधाकृष्ण रै, म्हैसूर डीएआरचे हेड कॉन्स्टेबल रामचंद्र लोकेश, तुमकूर जिल्हय़ाच्या तिपटूर शहर पोलीस स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल उस्मानसाब, बेंगळूर सीआयडीचे हेड कॉन्स्टेबल सतीश केंपय्या, मंगळूरच्या केएसआरबीच्या 7 व्या बटालियनचे हेड कॉन्स्टेबल प्रकाश शेट्टी यांना देखील राष्ट्रपती प्रशंसा पदकाची घोषणा झाली आहे.
अग्निशामक दलातील 7 जणांची निवड
राज्य अग्निशामक दलातील बळ्ळारीतील सुगनगौडा यांची राष्ट्रपती शौर्य पदकासाठी निवड झाली आहे. तर बेंगळूर अग्निशामक कार्यालयातील उपसंचालक सी. बसवण्णा, मुडबिद्रे येथील साहाय्यक अग्निशामक स्थानक अधिकारी प्रवीण यांना विशिष्ट सेवा पदक आणि कोप्पळ येथील जी. कृष्णोजी, मुडबिद्रे येथील योगीश बंगेरा, बेंगळुरच्या इपीआयपी अग्निशामक दलातील एम. तुळसुरायप्पा यांना प्रशंसा सेवा पदक जाहीर झाले आहे.