प्रवाशांची गैरसोय, इतर भागात बस सुसाट
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बस धावत आहेत. मात्र कोकणात धावणारी बस अद्याप ठप्पच आहे. त्यामुळे बेळगाव-कोकण असा प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बेळगाव-कोकण बससेवा कधी सुरू होणार? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बेळगाव-कोकण बससेवा ठप्प झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात बस कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने बससेवेवर परिणाम झाला आहे. मागील आठवडय़ापासून महाराष्ट्रात बससेवा सुरू झाली आहे. मात्र कोकणात एकही बस अद्याप धावली नाही. कोरोनाआधी कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, रत्नागिरी, रेडी, कुडाळ, कणकवली, देवगड आदी ठिकाणी बस धावत होत्या. त्यामुळे परिवहनलाही यातून चांगले उत्पन्न मिळत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव बऱयाच प्रमाणात कमी झाला आहे. त्याचबरोबर सीमाहद्दीवरील आरटीपीसीआरची सक्ती मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत बससेवेबरोबर आंतरराज्य मार्गावरदेखील बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. बसस्थानकातून महाराष्ट्र, गोवा राज्यात बससेवा सुरू झाली असली तरी कोकणात बससेवा सुरू करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे बेळगाव कोकण प्रवास करणाऱयांची हेळसांड होत आहे. दरम्यान प्रवाशांना खासगी वाहनांवरच अवलंबून रहावे लागत आहे.
चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातही बससेवा ठप्पच
कोकणबरोबर बेळगाव तालुक्मयाला लागून असलेल्या चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्मयातही बेळगावातून बससेवा अद्याप ठप्पच आहे. त्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या वाहनातून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः चंदगड भागातून बेळगावला येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र महाराष्ट्राची लालपरी संपामुळे ठप्प आहे. तर कर्नाटकची बससेवा अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे चंदगडवासियांचे हाल होताना दिसत आहेत.
कोकणात बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्रात बससेवा सुरू केली आहे. त्याचबरोबर कोकणातही बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तेथील आगार प्रमुखांनी सहकार्य दिले नाही. तसेच कर्नाटकच्या गाडय़ा कोकणात धावण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे बेळगाव-कोकण बससेवा थांबली आहे.
पी. वाय. नाईक (विभागीय नियंत्रण अधिकारी बेळगाव)
शासनाच्या निर्णयानंतर कर्नाटकात बस सुरू केल्या जाणार
बससेवा सुरू करण्याबाबत मंगळवारी निर्णय होणार आहे. त्यानंतर सर्व मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे. शिवाय शासनाच्या निर्णयानंतर कर्नाटकात बस सुरू केल्या जाणार आहेत.
नरेंद्र बोधे (आगार व्यवस्थापक, सावंतवाडी)