40 लीटर दारु जप्त, दोघांना अटक, काकती पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-कोवाड रस्त्यावरील बेकिनकेरे गावाजवळ असलेल्या सैराट धाब्यावर काकती पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून 40 लीटर दारु जप्त केली तर विनापरवाना दारु विकणाऱया दोघा जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांनी सोमनाथ भरमा पाटील (वय 34, रा. अतिवाड), भाऊ सातेरी कागणकर (वय 24, रा. कुदेमानी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. बेकिनकेरे परिसरात गेल्या काही वर्षांपासून बेकायदेशीर दारु विक्री करत असल्याची माहिती काकती पोलिसांना मिळाली. काकतीचे पोलीस निरीक्षक रमेश हळ्ळूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बेळगाव-कोवाड रस्त्यावर अनेक बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. तरी देखील कारवाई होत नव्हती. मात्र कोरोना काळात काकती पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकिनकेरे गावांमध्येही गावठी दारु मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. अनेकांचा त्याला वरदहस्त आहे. मात्र मद्यपी गावठी दारु पिऊन धिंगाणा घालत आहेत. त्याचा बेकिनकेरे गावातील नागरिकांना त्रास होत आहे. तेंव्हा गावठी दारु विक्री करणाऱयांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.