नूतन न्यायाधीश चंद्रशेखर जोशी यांची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांची बदली कलबुर्गी येथील जिल्हा न्यायाधीश म्हणून झाली आहे. बेळगाव जिल्हा न्यायाधीशपदी चंद्रशेखर मृत्यूंजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याबाबत आदेश पाठविला आहे.
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग हे गेल्या तीन वर्षांपासून बेळगावमध्ये कार्यरत होते. त्यांची आता कलबुर्गी जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे.