मंगळूर येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती : त्यांच्या जागी कोलारच्या सीईओंची नियुक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. कोरोना काळात जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्ही. राजेंद्र यांनी काम पाहिले आहे. मात्र या काळात बढतीवर बदली झाली असून त्यांच्या जागी कोलार जिल्हा पंचायतीचे सीईओ दर्शन एच. व्ही. यांची नियुक्ती झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून डॉ. के. व्ही. राजेंद्र हे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी ग्राम पंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामे केली आहेत. ते एक कडक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. बेकायदेशीर कामे करणाऱया अनेकांना त्यांनी चांगलाच चाप दिला होता. मात्र आता त्यांची बढतीवर बदली झाली आहे.
मंगळूर येथे जिल्हाधिकारी म्हणून ते काम पाहणार आहेत. याचबरोबर राज्यातील इतर आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत.