क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे कर्नाटक राज्य अमॅच्युअर बॉक्सिंग संघटना आयोजित सब ज्युनियर व सीयुबीएस मुला-मुलींच्या ट्रँग्युलर आंतरराज्य बॉक्सिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा बॉक्सिंग संघाने 5 सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्यपदके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
बेंगळूर येथे झालेल्या सब ज्युनियर व सीयूबीएस बॉक्सिंग स्पर्धेत 35 ते 37 किलो वजनी गटात सुवर्णा पाटीलने सुवर्ण, 43 ते 46 वजनी गटात प्रथमेश गर्डेने रौप्य पदक, 46 ते 49 वजनी गटात अभिषेक मेहेरवाडेने सुवर्ण, 55 ते 58 किलो गटात प्रकाश कोटबागीने सुवर्ण, 32 ते 34 किलो वजनी गटात प्रितम सरतारने रौप्य, 54 ते 57 वजनी गटात ज्ञानेश्वरी धुमधुमने सुवर्ण, 32 ते 34 वजनी किलो गटात सुप्रित वालीने रौप्य, 34 ते 36 वजनी गटात प्रिया सत्तारने सुवर्ण पदक, 44 ते 47 वजनी गटात यासिका हिरेमठने कांस्य पदक पटकाविले.
वरील सर्व बॉक्सर्सना अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, मल्लाप्पा करगुप्पी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर नामदेव मिरजकर, संजीवकुमार नाईक व हणमंत पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.