क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हा राज्य नोकर सांस्कृतिक क्रीडा खाते व युवजन क्रीडा खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय राज्य नोकर खाते क्रीडा स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा कर्मचारी क्रीडा खात्याच्या संघाची निवड करण्यात आली. जिल्हय़ातून सर्व खात्यातील क्रिकेटपटूंनी या निवड चाचणीत भाग घेतला होता. जगदीश पाटील, किरण गणाचारी, किरण सावंत, संतोष पाटील यांच्या उपस्थितीत या संघाची निवड चाचणी घेण्यात आली. आर. एन. कांबळे यांची कर्णधारपदी तर प्रवीणकुमार अंगडी यांची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 26 फेब्रुवारी रोजी बिदर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघ रवाना होणार आहेत.