आज बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण ७० वर्षाचा तर दुसरा ४८ वर्षाचा आहे. या दोन मृत्यूंनी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.रायबाग तालुक्यातील कुडची येथील ७० वर्षीय वृद्धाचा पहिल्यांदा मृत्यू झाला. आज मध्यरात्री २.३० वाजता त्या वृद्धास श्वसन आणि बरख्याचा त्रास जाणवल्याने त्याला दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता त्याचा मृत्यू झाला.वीरभद्र नगर येथील ४८ वर्षीय इसमाचा सायंकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला. त्याला काल रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले होते.हे दोन मृत्यू खळबळ माजवणारे आहेत.
Previous Articleसोलापूर शहरमध्ये ८३ कोरोना रूग्ण, ४ जणांचा मृत्यू
Next Article बेंदराला सर्जाराजा सजले पण…!