आणखी तीन डॉक्टरांना कोरोना : वैद्यकीय कर्मचाऱयांनाही बाधा : तालुक्यात 134 जणांना लागण : दहा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्यात गुरुवारी 259 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एका बेळगाव तालुक्मयात 134 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिह्यातील 10 जणांचा बळी गेला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 50 जणांना गुरुवारी घरी पाठविण्यात आले आहे. बिम्स्मधील दोन डॉक्टरांसह एकूण तीन डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेळगाव शहर व तालूक्मयात गुरुवारी 134 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 30 जण तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावातील आहेत तर 104 जण शहर व उपनगरातील आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱयांनी ही माहिती दिली असून गोकाक तालुक्मयातील 30, बैलहोंगल तालुक्मयातील 26, अथणी तालुक्मयातील 17, हुक्केरी, सौंदत्ती, रामदुर्ग, रायबाग, खानापूर तालुक्मयातही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बेळगाव शहरातील महांतेशनगर, गणेशनगर-हिंडलगा, गोंधळी गल्ली, दरबार गल्ली, श्रीनगर, अनगोळ, शहापूर, खासबाग, खडेबाजार, उज्वलनगर, विरभद्रनगर, रुक्मिणीनगर, वडगाव, येळ्ळूर, नेहरुनगर, शाहूनगर, न्युगांधीनगर, आझादनगर, वंटमुरी कॉलनी, कपिलेश्वर रोड, अमाननगर, गुरुप्रसाद कॉलनी, कोल्हापूर सर्कल, न्युवैभवनगर, कोतवाल गल्ली, भोवी गल्ली, टिळकवाडी, नानावाडी, शिवबसवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बिम्स्मध्ये सेवा बजाविणारे दोन डॉक्टर, खासगी इस्पितळातील एक डॉक्टर, बैलहोंगल सरकारी इस्पितळात सेवा बजाविणारी महिला कर्मचारी, बेळगाव येथील खासगी इस्पितळात काम करणारे दोन कर्मचारी, बैलहोंगल तहसीलदार कार्यालयातील दोन कर्मचारी, सांबरा एअरफोर्समधील दोघे जण व मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या 9 पोलीस व त्यांच्या कुटुंबियांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.