89 वषीय वृध्देचा मृत्यू, सक्रिय रुग्ण संख्या 763 वर
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी बेळगाव शहर व जिह्यात कोरोनाचे 161 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 115 रुग्ण एका बेळगाव शहर व उपनगरांतील असून सक्रिय रुग्ण संख्या 763 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी 135 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रत्यक्षात हा आकडा 161 इतका असून बेळगाव परिसरात रुग्ण संख्या वाढती आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 32 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 28 हजार 434 वर पोहोचली असून कोरोनामुळे बुधवारी खासगी इस्पितळात 89 वषीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 353 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 27 हजार 266 जणांनी कोरोनावर मात केली असून 2 हजार 396 जणांचा अहवाल यायचा आहे.
आतापर्यंत 6 लाख 24 हजार 107 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 5 लाख 89 हजार 996 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 36 हजार 233 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. खास करुन बेळगाव शहर व उपनगरांत कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली आहे.
गुरूवारी पीसीविंगमधील आणखी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कंग्राळी खुर्द, हिंडलगा, मच्छे, पंतनगर या तालुक्मयातील चार गावांतही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सुभाषनगर, हिंदवाडी, अजमनगर, भडकल गल्ली, भाग्यनगर, बॉक्साईट रोड, भारतनगर-वडगाव, बिम्स् क्वॉर्टर्स, कणबर्गी रोड, डिफेन्स कॉलनी हिंडलगा, एसपीएम रोड, हनुमाननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
हिंडाल्को कॉलनी, जाधवनगर, महांतेशनगर, माळमारुती, नेहरुनगर, न्युगांधीनगर, राणी चन्नम्मानगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, उज्वलनगर, विरभद्रनगर, यमनापूर, विनायक कॉलनी परिसरात रुग्ण आढळून आले असून गुरूवारी टिळकवाडी परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. या बरोबरच कोटबागी, मदवाल, कुडची, मोळे, मुगळी, मुनवळ्ळी, निलजी, मणिकट्टी, गोकाक, निपाणी, सौंदत्ती, खानापूर, ऐनापूर, अंबडगट्टी, अथणी, बैलहोंगल, बटकुर्की परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे.