बेंगळूर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात 18 जुलैपर्यंत वादळी वाऱयासह पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बेळगाव, धारवाड, हावेरी, बागलकोट, चित्रदुर्ग, दावणगेरे या जिल्हय़ांत 18 जुलै रोजी ‘यलो अलर्ट’ तर 15, 16, 17 जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. किनारपट्टी भागासह दक्षिण कर्नाटकातही पुढील चार दिवस दमदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. कारवार, मंगळूर, उडुपी, चिक्कमंगळूर, शिमोगा, कोडगू आणि हासन जिल्हय़ांमध्ये 15 आणि 17 जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ आणि 16 जुलै रोजी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
Previous Articleविद्यार्थ्यांना हॉलतिकीट नाकारणाऱया शाळांवर कारवाई
Next Article पोलीस अधिकाऱयांना ‘एनडीए’च्या धर्तीवर प्रशिक्षण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.