बेळगाव येथील मुख्य कार्यालयासह एकूण सहा आरटीओ कार्यालये
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिह्याचा विस्तार वाढत असल्याने येथील वाहनांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. बेळगाव व खानापूर तालुक्मयात एकूण 6 लाख वाहने रस्त्यांवर फिरत आहेत. लोकसंख्येच्या मानाने ही वाहने अधिक असल्याचे मत आरटीओ शिवानंद मगदूम यांनी व्यक्त केले. पूर्वी जिह्याच्या सर्व वाहनांचा कारभार बेळगाव आरटीओ कार्यालयावर पडत होता. आता जिह्यात सहा आरटीओ विभाग करण्यात आल्याने बेळगाव कार्यालयावरील भार कमी झाला आहे. मात्र, अजूनही महत्त्वाची काही कामे बेळगाव येथील आरटीओ कार्यालयावरच सोपविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्रारंभी बेळगाव येथील आरटीओ कार्यालयानंतर जिह्यात एकूण पाच उपआरटीओ कार्यालयांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे बेळगाव आरटीओ कार्यालयावरील भार काही प्रमाणात कमी झाला. बेळगाव, चिकोडी, गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग आणि नव्याने अथणी येथे आरटीओ कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे बेळगाव जिह्यात आता एकूण सहा आरटीओ कार्यालये आहेत. सध्या आरटीओ कार्यालयांत कोरोना काळात महसुलात घट झाली आहे. त्या अनुषंगाने अनलॉक 5 मध्ये विविध सवलती देण्यात आल्याने या सर्व कार्यालयांतील गर्दी वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे मागील वषीच्या महसुलाबरोबर यावषीचा महसूल जमा करण्यासाठी कार्यालयातील अधिकारी धडपडताना दिसत आहेत.
बेळगाव आरटीओ विभागाच्या कार्यक्षेत्रात बेळगाव व खानापूर तालुका असून येथील कोड क्रमांक केए 22 आहे. याचबरोबर चिकोडी कार्यक्षेत्रात अर्धे हुक्केरी व निपाणी तालुक्मयांचा समावेश असून यांचा कोड क्रमांक केए 23, गोकाक आरटीओ विभागाच्या कार्यक्षेत्रात अर्धे हुक्केरी आणि मुडलगीचा समावेश करण्यात आला असून कोड क्रमांक आहे 49, बैलहोंगलच्या कार्यक्षेत्रात अर्धे सौंदत्ती आणि कित्तूर तालुक्मयांचा समावेश असून कोड क्रमांक केए 24 आहे. रामदुर्ग उपआरटीओच्या कार्यक्षेत्रात अर्धे सौंदत्तीचा समावेश असून कोड क्रमांक केए 69, याचबरोबर अथणी उपआरटीओ विभागात कागवाड, रायबाग तालुक्मयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा कोड क्रमांक 71 आहे.