डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिसांना लागण सुरूच
प्रतिनिधी / बेळगाव
शनिवारी जिल्हय़ातील 239 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने गेल्या 24 तासांत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आजाराने मृत्युमुखी पडलेल्या दोघा जणांची स्वॅब तपासणी निगेटिव्ह आली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 21 हजार 550 हून अधिक झाली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरातील 43, ग्रामीण भागातील 21 असे तालुक्यातील 64 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या 86 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 19 हजार 97 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या 2 हजार 131 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 316 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी सांबरा एटीएसमधील दोघे जण व पोलीस दलातील एका अधिकाऱयासह तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विश्वेश्वरय्यानगर परिसरातील एका डॉक्टर दांपत्याला कोरोनाची लागण झाली आहे. बिम्समधील वैद्यकीय कर्मचाऱयांनाही लागण सुरूच आहे.
किणये, बस्सापूर, इदलहोंड, शिवापूर, आंबेडकरनगर, आनंदनगर, भाग्यनगर, चिदंबरनगर, अष्टे, सांबरा, सुळेभावी, धामणे, गणेशपूर, गोकुळनगर, हिरेबागेवाडी, हुंचेनहट्टी, कंग्राळी बी. के., हिंदवाडी, जयनगर, कपिलेश्वर रोड, महांतेशनगर, मजगाव, खंजर गल्ली, टिळकवाडी, विश्वेश्वरय्यानगर, वडगाव, वंटमुरी कॉलनी, परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
महावीरनगर मजगाव, नेहरूनगर, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, रेव्हेन्यू कॉलनी, समर्थनगर, शहापूर, शाहूनगर, शेट्टी गल्ली, सुभाषनगर, एसपीएम रोड, तेलगू कॉलनी, परिसरातही शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. लक्षणे नसणाऱया बाधितांवर घरीच उपचार करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.