मृतांचा आकडा वाढताच : सलग दुसऱया दिवशीही 17 जण दगावले : बेळगावात 122 अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना बाधित व संशयितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतेच आहे. सलग दुसऱया दिवशीही जिह्यातील 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. केवळ 48 तासांत 34 जणांचा बळी गेल्याचे सामोरे आले आहे. तर शनिवारी जिह्यातील 249 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव शहर व तालुक्यातील 122 जणांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या 24 तासांत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बेळगाव शहर व तालुक्यातील 9 जणांचा समावेश आहे. 17 पैकी 3 संशयित आहेत तर उर्वरितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बेळगाव परिसरातील शहापूर, अनगोळ, आंबेवाडी येथील बाधितांचा समावेश आहे. तर निपाणी, सौंदत्ती, अथणी, कुडची-ता. रायबाग, गोकाक, चिकोडी परिसरातील बाधित व संशयितांचा यामध्ये समावेश आहे.
जिह्यातील 249 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील 122 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरातील 93 व ग्रामीण भागातील 29 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे नसणाऱयांवर कोविड-19 केअर सेंटरमध्ये व त्यांच्या त्यांच्या घरीच उपचार करण्यात येत आहेत. शनिवारचा बाधितांचा सरकारी आकडा मात्र 219 इतका आहे.