शहापूर, वडगाव परिसरात रुग्ण संख्या वाढली : 24 तासांत 17 जण दगावले : आयसीएमआरच्या 10 कर्मचाऱयांना लागण
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात कोरोनाचा फैलाव वाढतो आहे. शुक्रवारी आणखी 156 अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बेळगाव शहरातील 80 व तालुक्यातील चौघा जणांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासांत 17 जण दगावल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली असून राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटीनमधील माहितीनुसार 5 इतका आहे.
स्वॅब तपासणी करण्यात आघाडीवर असलेल्या आयसीएमआर लॅबमधील 10 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी याच लॅबमधील तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या सर्व 13 जणांवर एका सरकारी वसतीगृहात उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासांत जिह्यातील 157 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बेळगाव शहरातील 80 व ग्रामीण भागातील चौघा जणांचा यामध्ये समावेश आहे. वडगाव, खासबाग, शहापूर, जुने बेळगाव परिसरातील 20 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहापूर परिसरातील दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार शहापूर, वडगाव, वैभवनगर, विरभद्रनगर, उज्वलनगर, अजमनगर परिसरात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. शुक्रवारी तेंग्गीन गल्ली, वडगाव येथील 4, होसूर बसवाण गल्ली येथील 2, शहापूर येथील 2, विरभद्रनगर येथील 3, महांतेशनगर येथील 2, वडगाव येथील 5, जुने बेळगाव येथील 1, खासबाग येथील 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.