बेळगाव तालुक्याला मात्र वगळले,पोलीस आयुक्तांचा आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमी पूजनाचा कार्यक्रम बुधवार दि. 5 रोजी होत आहे. त्यामुळे बेळगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव तालुका वगळता जिह्यातील सर्व दारु दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी काढला आहे.
मंगळवार दि. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 पासून ही दुकाने बुधवार दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद असणार आहेत. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आहे. त्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.