कोरोनाने मंगळवारी आणखी चार जण दगावले
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मंगळवारीही चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा आणि दोन तरुणांचा समावेश आहे. हे सर्व जण बेळगाव तालुक्मयातील आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ातील 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
मंगळवारी कोरोनामुळे 38 वषीय आणि 30 वषीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 55 वषीय आणि 60 वषीय पुरुषांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.