प्रतिनिधी / बेळगाव
जिह्यातील आणखी 36 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधितांची संख्या 252 वर पोहोचली असून यामध्ये बंबरगा, केदनूर, होनगा, हंटमुरी या बेळगाव तालुक्मयातील बाधितांचा समावेश आहे.
यापैकी बहुतेक जण मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा भागातून बेळगावला आलेल्या चाकरमान्यांचा समावेश आहे तर एक जण हरियाणामधून बेळगावात परतलेला आहे. या सर्व जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. कर्नाटकात शुक्रवारी आजवरचे सर्वात अधिक 515 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.