बाधितांच्या संख्येने पार केला 25 हजारांचा आकडा : 35 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
जिह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने 25 हजारांचा आकडा पार केला आहे. बुधवारी एकूण बाधितांची संख्या 25 हजार 41 वर पोहोचली असून 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनामुक्त झालेल्या 35 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 28 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आणखी 1 हजार 791 जणांचा अहवाल यायचा आहे. जिह्यातील 24 हजार 266 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या वेगवेगळय़ा इस्पितळात 437 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत 2 लाख 43 हजार 13 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 2 लाख 14 हजार 773 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 29 हजार 171 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. लक्षणे आढळून आल्यास त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे.
केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बुधवारी राज्यातील 2 हजार 584 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये माहिती देण्यात आली आहे. यावरुन रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण घटत चालल्याचे दिसून येत आहे.