चार जणांचा मृत्यू, तालुक्यात 76 जण बाधित
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांच्या संख्येत पहिल्यापेक्षा काहीशी घट झाली तरी दररोज 100 हून अधिक रुग्ण जिह्यात सापडत आहेत. मंगळवारी 158 जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू देखील झाला आहे. बेळगाव तालुक्मयामधील 76 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आरोग्य विभागाने हा अहवाल दिला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये 60 जण कोरोना बाधित असुन ग्रामीण भागातील 16 जण असे एकूण तालुक्यात 76 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांना वेगवेगळय़ा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाची संख्या रोडावत आहे. तरी देखील ग्रामीण भागामध्ये संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. उपचारामुळे अनेक जण बरे होत असून कोरोना निगेटिव्ह अहवाल देखील वाढले आहेत. जनतेमध्ये आता भिती कमी झाली आहे. याचबरोबर कोरोनापासून संरक्षण मिळविण्यासाठी मास्क तसेच इतर नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना झाल्यानंतर साऱयांनाच भिती वाटत होती. मात्र आता रुग्ण बरे होत असल्यामुळे तसेच काही प्रमाणात योग्य उपचार मिळत असल्यामुळे रुग्ण लवकर बरे होत आहेत. मंगळवारी शहरातील आनंदनगर-वडगाव, शहापूर, शाहूनगर, टिळकवाडी, भाग्यनगर, चन्नम्मानगर, गणपत गल्ली, चव्हाट गल्ली, गणेशपूर, मजगाव, कुमारस्वामी लेआऊट, माळमारुती, अनगोळ, श्रीनगर, वैभवनगर, वंटमुरी, विजयनगर, विनायकनगर, आदर्शनगर, श्रीनगर या परिसरामध्ये रुग्ण आढळले आहेत.
ग्रामीण भागातील सांबरा, भेंडीगेरी, सुळेभावी, मास्तमर्डी, काकती, कंग्राळी खुर्द, गणेशपूर, येळ्ळूर, कडोली, या गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागामध्येही रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली असली तरीही रुग्ण आढळत आहेत. आता ग्रामीण भागात डॉक्टर देखील कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे बऱयापैकी दिलासा मिळत आहे.