बेळगाव तालुक्मयातील 70 जण पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
शनिवारी बेळगाव शहर व जिह्यातील 190 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 70 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 44 व ग्रामीण भागातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून होनगा येथील रहिवाशाचा मृत्यू झाला आहे.
होनगा येथील एका रहिवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून गेल्या 24 तासांत या एकाच मृत्यूची नोंद झाली आहे. सांबरा एअरफोर्स, आयटीबीपी पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर आदींना कोरोनाची लागण सुरूच आहे. सांबरा एटीएसमधील 10, आयटीबीपीमधील पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बिम्स व खासगी इस्पितळांतील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारच्या अहवालात आरोग्य विभागातील चारहून अधिक जणांचा यामध्ये समावेश आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
बस्सापूर, बिजगर्णी, हुंचेनहट्टी, काकती, कंग्राळी बी. के., कुदेमनी, मच्छे, मुतगा, पंतबाळेकुंद्री, शिंदोळी, शहापूर, अंजनेयनगर, अशोकनगर, बसव कॉलनी, हनुमाननगर, हिंदवाडी, काकतीवेस रोड, कंग्राळी खुर्द, माळमारुती, मृत्युंजयनगर, न्यू गांधीनगर, पिरनवाडी, पी. बी. रोड, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शाहूनगर, हिंडलगा परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. श्रीनगर, सोनोली, बसवण कुडची, टिळकवाडी, वडगाव, विनायकनगर, यमनापूर परिसरातही शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागामध्ये तपासणीसाठी असलेले दडपण कमी झाले आहे. त्यामुळे तपासणीही कमी झाली आहे. म्हणून संख्या रोडावत आहे.