बेळगावसह जिह्यात 143 जण झाले कोरोनामुक्त, महिलेसह दोघे जण दगावले
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह जिह्यात शुक्रवारी 143 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 23 हजार 20 वर पोहोचली असून सध्या केवळ 961 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. तर दिवसभरात 76 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
शहर व उपनगरांतील 15 व ग्रामीण भागातील 4 असे एकूण बेळगाव तालुक्यातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बेळगाव येथील 63 वषीय वृध्द व खानापूर येथील 65 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 328 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 24 हजार 309 वर पोहोचली आहे. अद्याप 1 हजार 396 जणांचे अहवाल यायचे आहेत. उपलब्ध माहितीनुसार स्वॅब तपासणी संथगतीने सुरु आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी दाखविली जात आहे. प्रत्यक्षात कोरोना महामारीचा फैलाव कमी झाला नाही. असाच अर्थ काढला जात आहे.
आरोग्य विभागाकडून आतापर्यंत 2 लाख 6 हजार 491 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 1 लाख 79 हजार 489 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 28 हजार 770 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. त्यामुळे दसरा, दिवाळीत कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्मयता अधिक आहे.
गुरामट्टी, हिंडलगा, बापट गल्ली, बसव कॉलनी, भाग्यनगर, जेएलव्हींग कॅम्प, बेळगुंदी, खासबाग, महाव्दार रोड, महांतेशनगर, मत्तिवडे, शिवबसवनगर, शिवाजी कॉलनी टिळकवाडी, शिवाजीनगर, विरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. घराबाहेर पडताना प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे पालन केले तरच कोरोनावर मात करता येणार आहे.