बेळगाव : बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या 2022-23 च्या व्यवस्थापन समितीचा शुक्रवार दि. 13 रोजी तिसऱया रेल्वेगेटजवळील हॉटेल सॅन्टोरिनी येथे अधिकारग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन बेंगळूरचे अध्यक्ष एस. नंजुंड प्रसाद उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच सीजीएसटी आयुक्त बसवराज नलेगावे, इन्कम टॅक्स सहआयुक्त राजेश्वरी मेनन, कमर्शियल टॅक्स सहआयुक्त यास्मिन बेगम बालिकर, कमर्शियल टॅक्स सहआयुक्त रेणेश्वर मेघण्णावर आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अध्यक्ष जितेश ए. कब्बुर, उपाध्यक्षा महांतेश एम. दडिगुंडी, सचिव भरतेश के. मुरगुंडे यासह इतर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना पदाचा कारभार सोपविला जाणार आहे.
Previous Articleबिजगर्णी येथे महालक्ष्मी मंदिराचा चौकट पूजन कार्यक्रम उत्साहात
Next Article संशयास्पद व्यक्तींबद्दल माहिती द्या
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.