प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱयांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंजुंड प्रसाद तसेच निमंत्रित म्हणून आयकर विभागाच्या उपायुक्त यास्मिन बेगम वालीकर उपस्थित होत्या.
यावेळी जितेश कब्बूर यांनी बेळगाव शाखेचे नूतन अध्यक्ष, महांतेश दंडीगुंडी यांनी उपाध्यक्ष, भरतेश मुरगुंडे यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला. नंजुंड यानी सर्वांना अधिकार प्रदान करून त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. यास्मिन यांनी नूतन पदाधिकाऱयांना शुभेच्छा दिल्या.