वार्ताहर/ बेळगाव
कोरोनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोमवारी सापडलेल्या 16 कोरोनाबाधित रुग्णानंतर मंगळवारी 4 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामध्ये बेळगाव तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. यामुळे बेळगाव तालुक्यामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्य खात्याने दिलेल्या जिल्हा बुलेटिनमध्ये नेहरुनगर येथील 24 वर्षीय तरुणाला, बेळगुंदी येथील 42 वर्षीय व्यक्तीला तसेच सहय़ाद्रीनगर येथील 5 वर्षीय बालकाचा समावेश आहे. याचबरोबर रायबाग तालुक्यातील निलजी गावच्या 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.