बेळगाव
देशाची राजधानी असणाऱया दिल्लीला बेळगावमधून विमानफेरीला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत चालला आहे. यामुळेच स्पाईस जेट कंपनीने आठवडय़ातून चार दिवस विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 20 डिसेंबरपासून सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार असे चार दिवस दिल्ली-बेळगाव-दिल्ली असा विमानप्रवास करता येणार आहे. यामुळे बेळगाव, कोल्हापूर, सांगली, कोकण व धारवाड जिल्हय़ातील प्रवाशांची सोय होणार आहे. बेळगाव विमानतळावरून मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, तिरुपती, कडाप्पा, म्हैसूर, अहमदाबाद, जयपूर, पुणे, इंदूर यासह इतर शहरांना विमानफेरी सुरू होती. परंतु बेळगावमधून दिल्लीसाठी विमानफेरी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. स्पाईस जेटने ऑगस्ट 2021 मध्ये दिल्ली-बेळगाव-दिल्ली अशी आठवडय़ातून 2 दिवस विमानफेरी सुरू केली. अल्पावधीतच या विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला