प्रतिनिधी/ बेळगाव
राज्याचे कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी बेळगाव बार असोसिएशनला भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी यांनी केले. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके हेही उपस्थित होते. त्यांनी कायदामंत्र्यांकडे बेळगाव न्यायालयाच्या आवारातील विविध समस्या दूर करण्यासाठी किमान 2 कोटी रुपयांची गरज असून तो निधी मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे.
बेळगाव न्यायालयाचे आवार हे मोठे आहे. या ठिकाणी अनेक सोयीसुविधा होणे गरजेचे आहे. बेळगाव न्यायालयामध्ये दोन हजारहून अधिक वकील सेवा बजावत आहेत. याचबरोबर बेळगाव न्यायालयामध्ये 34 हून अधिक न्यायालये आहेत. त्या सर्व न्यायालयांना जागा कमी पडते. याचबरोबर पार्किंगची समस्याही निर्माण होत आहे. तेव्हा न्यायालय आवाराचा विस्तार आणि विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जुन्या लायब्ररीमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी ऍड. गिरीश पाटील, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई यांच्यासह इतर ज्ये÷ वकील उपस्थित होते.