प्रतिनिधी / बेळगाव
महिन्याभरापूर्वीच सुरळीत झालेली बेळगाव-पुणे विमानफेरी पुन्हा बंद करण्यात आली आहे. तांत्रिक कारणाने मंगळवार दि. 20 पासून ते 9 मेपर्यंत ही फेरी बंद राहणार असल्याची माहिती बेळगाव विमानतळाकडून देण्यात आली. विमानफेरी बंद झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अलायन्स एअरने मध्यंतरी काही दिवस बेळगाव-पुणे विमानफेरी रद्द केली होती. तांत्रिक कारणाने ही फेरी रद्द करण्यात आल्याची माहिती त्यावेळी दिली होती. यामुळे अलायन्सची बेळगाव-पुणेसोबतच बेळगाव-बेंगळूर फेरीही रद्द केली होती. बेळगावमधून पुण्याला प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असल्याने ही फेरी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यामुळे महिन्याभरापूर्वीच पुणे-बेळगाव फेरी सुरू करण्यात आली होती.
आता पुन्हा ही फेरी मंगळवार दि. 20 पासून 9 मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर ही फेरी पुन्हा सुरू करण्यात येईल, असे बेळगाव विमानतळातर्फे कळविण्यात आले आहे. परंतु यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.