बेळगाव-गोवा वाहतुकीचा राजमार्ग : परदेशी पर्यटक ड्रग्ज माफियांचे मुख्य ग्राहक
प्रतिनिधी/ बेळगाव
20 वर्षांपूर्वी आझमनगर व काकती परिसरात केंद्रीय अबकारी विभागाच्या अधिकाऱयांनी मँडेक्स प्रकरणाचा भांडाफोड केला होता. मोठय़ा प्रमाणात मँडेक्सचे उत्पादन घेऊन महाराष्ट्रासह विविध राज्यात पाठविले जात होते. त्यानंतर बेळगाव पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाच्या मुसक्मया आवळल्या होत्या. आता पुन्हा बेळगाव परिसरात ड्रग्ज माफिया सक्रिय झाले आहेत.
रॅकेटमध्ये राजकीय नेते, पोलीस अधिकारी
चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बेळगावच्या ड्रग्ज रॅकेटसंबंधी ठळक चर्चा होऊ लागली आहे. या रॅकेटमध्ये राजकीय नेते व पोलीस अधिकारी सहभागी आहेत. ते स्वत: बेळगावहून गोव्याला अमली पदार्थ पाठवतात, अशी माहिती मिळाली होती. नंतर त्याची पूर्णपणे चौकशी झाली नाही. सध्या राजकीय नेत्यांची नावे सांगत काही जण या व्यवसायात गुंतले आहेत. काही जुने गुन्हेगार कारागृहात बसून ड्रग्ज माफियांवर नियंत्रण ठेवून आहेत.
28 मे 2007 रोजी तत्कालिन जिल्हा पोलीसप्रमुख हेमंत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱयांनी आकाश भालचंद्र देसाई (वय 34) रा. बोळमल बोळ, शहापूर याच्यासह चौघा जणांना अटक करून मोठय़ा प्रमाणात हशिश जप्त केले होते. तब्बल अकरा वर्षांनंतर या प्रकरणी 11 डिसेंबर 2018 रोजी आकाश व त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
फोटो फ्रेममधून हशिशचा पुरवठा
केवळ महाराष्ट्र, गोवाच नव्हे तर नऊ देशांना फोटो प्रेममधून हशिश पाठविले जात होते. देवदेवतांच्या फोटोच्या मागे हशिश चिकटवून कुरियरने ते सावजापर्यंत पोहोचविले जात होते. एका प्रेममध्ये 300 ते 400 ग्रॅम हशिश ठेवण्यात येत होते. आकाश देसाई सध्या कारागृहात आहे. त्यानंतर नेपाळसह काही परदेशी नागरिकांनाही बेळगावात अटक झाली होती.
आता पुन्हा ड्रग्ज माफिया सक्रिय झाले आहेत. बेळगावात गांजा, पन्नी व अफिम चालते. मात्र, हशिश, ब्राऊन शुगर आदींची गोव्याला तस्करी केली जाते. पन्नी पुरवठा मुंबईहून होत होता. मध्यंतरी खडेबाजार पोलिसांनी बेळगावला पन्नी पुरविणाऱया मुंबईच्या महिलेला अटक केली होती. त्यानंतर पन्नी पुरवठा कमी झाला असला तरी गांजाचा वापर व विक्री वाढली आहे.
उपलब्ध माहितीनुसार गोवा येथील परदेशी पर्यटकांना अमली पदार्थ पुरविण्यासाठी बेळगावात मोठय़ा प्रमाणात यंत्रणा कार्यरत आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अमली पदार्थांची प्रकरणे बेळगावसह कर्नाटकात ठळक चर्चेत आली. त्यावेळीही बेळगाव-गोव्याचा उल्लेख झाला. त्यामुळे मध्यंतरी थोडे दिवस थंड असलेली अमली पदार्थांची वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे.
पोलिसांनी मोहीम उघडण्याची गरज
अमली पदार्थांच्या तस्करीतून बेळगावातील अनेकांनी मोठय़ा प्रमाणात माया जमविली आहे. खासकरून वाहने व जागेत गुंतवणूक केली आहे. एकेकाळी कफल्लक असणारे सध्या आलिशान वाहनांमधून फिरत आहेत. हॉटेल व इतर व्यवसायात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. पुन्हा एकदा बेळगावात ड्रग्ज माफियांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.
दहा महिन्यात 5 क्विंटल गांजा जप्त : लक्ष्मण निंबरगी
गेल्या दहा महिन्यांमध्ये बेळगाव जिल्हय़ात पाच क्विंटलहून अधिक गांजा जप्त करण्यात आला आहे. यासंबंधी तरुण भारतने जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जानेवारी ते ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हय़ात गांजा उत्पादन व विक्रीप्रकरणी एकूण 52 एफआयआर दाखल झाले आहेत. 93 जणांना अटक करून 494 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत 44 लाख 69 हजाराहून अधिक होते. अमली पदार्थांविरुद्ध आपण मोहीम उघडल्याचेही त्यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्मयात 37 जणांना अटक : डॉ. विक्रम आमटे
बेळगाव जिल्हय़ाप्रमाणेच शहर व तालुक्मयात पोलीस आयुक्तालयाच्यावतीने अमली पदार्थांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली आहे. दहा महिन्यात गांजा, पन्नी विक्रीप्रकरणी बारा गुन्हे दाखल करण्यात आले असून 37 जणांना अटक करण्यात आली आहे. 42 किलो 635 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली.