बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथून बेंगळूरला निघालेल्या परिवहन मंडळाच्या कोरोना या आराम बसला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बेळगाव येथील मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटून सकाळी बेंगळूरला पोहोचण्याचे उद्दिष्ट होते. मात्र पहाटेच्या सुमारास या बसला चित्रदुर्गनजीक आग लागली. काही प्रवाशांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी चालकाला तातडीने याची माहिती दिली. बस चालकाने त्वरित बस रस्त्याच्याकडेला थांबविली. त्यानंतर सर्व प्रवासी बसमधून सुरक्षितरित्या खाली उतरले. त्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आग आटोक्मयात आणण्यात आली. मात्र प्रवाशांच्या बॅगा आणि इतर साहित्य आगीत भस्मसात झाले.