नैसर्गिक अधिवासाबरोबर वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ : वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी विविध उपाय
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव वनविभागाच्या हिरवाईने निसर्गप्रेमींना व पर्यटकांना जंगल सफारीची भुरळ घातली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वनखातेही ऑनलाईन झाले आहे. बेळगाव वनविभागात वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास वाढल्याने साहजिकच वनप्राण्यांची संख्याही वाढली आहे. वनखाते वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे.
एकीकडे देशात वनक्षेत्र वाढीत कर्नाटकचा वाटा मोठा आहे. राज्यातील वनक्षेत्रात एकूण 1025 चौ. कि. मी. इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक अधिवास वाढला आहे. बेळगाव विभागातील लोंढा, नागरगाळी, भीमगड, खानापूर, कणकुंबी, गोल्ल्याळी, जांबोटी आदी धनदाट जंगलात वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. या वन्यप्रदेशात विशेषकरून वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल, गवे, चित्ते, कोल्हे, तरस, रानडुक्कर आढळून येतात. खानापूर परिसरातील वन्यप्रदेशाला जैवविविधतेने नटलेला भाग म्हणून ओळखले जाते. या परिसरातील घनदाट जंगलात वनराई, बांबूंचे आच्छादन, हिरवेगार गवत व बारमाही वाहणारे पाणी यामुळे चितळ, सांबर, गवीरेडे, हरिण आदी प्राण्यांची संख्या अधिक असल्याने यावर उपजीविका करणाऱया वाघ, बिबटय़ांची संख्यादेखील वाढली आहे.
वन्यभागात वाघांची संख्या वाढत असून शेजारी असलेल्या महाराष्ट्र व गोव्याच्या जंगलात भटक्मया वन्यप्राण्यांचा वावर असतो. शिवाय दरवषी नवीन जन्म घेणाऱया वन्यप्राण्यांची संख्याही अधिक असते. बेळगाव तालुक्मयात मुचंडी, के. के. कोप्प, कणबर्गी, अनगोळ, धामणे, काकती व बसवणकोळ्ळ आदी वन्यप्रदेश राखीव म्हणून ठेवला आहे.
वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे, याकरिता विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. लोंढा, खानापूर, कणकुंबी, नागरगाळी व भीमगड अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयांची व्यवस्था करण्यात आली आहे. अचानक जंगलाला आग लागलीच तर त्या आगीची माहिती घेण्यासाठी उपग्रहाची मदत घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे जंगलाला अचानक लागलेली आग तात्काळ विझविण्यासाठी मदत होणार आहे.
जिल्हय़ातील वन्यप्रदेशातील वाघांची संख्या
वन्यप्रदेश | वाघांची संख्या |
भीमगड | 3 |
लोंढा | 2 |
कणकुंबी | 2 |
खानापूर | 12 |
नागरगाळी | 2 |
गोल्याळी | 2 |
आजपासून सिंहांचे होणार दर्शन
शहरापासून अवघ्या आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात दाखल झालेले तीन सिंह पर्यटकांसाठी गुरुवारपासून खुले करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यटकांसह सर्वसामान्यांची प्रतीक्षा संपली असून सिंहांचे दर्शन होणार आहे. भुतरामहट्टी येथील मिनी झूमध्ये गत महिन्यात बेंगळूर शेजारी असलेल्या बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क येथून दोन नर व एक मादी असणारे नकुल, कृष्ण आणि निरुपमा अशी नावे असलेले तीन सिंह आणण्यात आले आहेत. त्यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आले होते. बुधवारी येथील बंदिस्त परिसरात सिंहांना प्रायोगिक तत्त्वावर सोडून स्थानिक वातावरणात रुळतात की नाही, याची चाचणी घेण्यात आली. यातील नकुल नावाच्या सिंहाला पिंजऱयाच्या बाहेर सोडून येथील वातावरणाशी जुळवून घेतले आहे की नाही, याची चाचणी घेतली. तिन्ही सिंह येथील वातावरणात चांगले रुळले असून गुरुवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत.