प्रतिनिधी/ बेळगाव
कर सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरपट्टी भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. लॉक डाऊन करण्यात आल्याने बेळगाव वन सह महापालिका कार्यालयात घरपट्टी भरून घेण्याची प्रक्रिया बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घरपट्टी भरणे मुश्कील बनले आहे. महापालिकेच्या महसूल विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणू बाबत उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहेत. परिणामी घरपट्टी भरण्याची समस्या निर्माण झाली आहे. घरपट्टी भरायची कुठं? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे शहरातील असंख्य मालमत्ताधारक एप्रिल महिन्यात घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतात. पण कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने मार्च महिन्यापासून संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. महापालिकेचे कामकाज देखील थांबले आहे. मालमत्ता कर भरण्याची प्रक्रियादेखील थंडावली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱया कामात महापालिकेच्या आरोग्य विभागासह महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे महसूल वसुलीचे काम थांबले आहे. पण एप्रिल महिन्यात पाच टक्के कर सवलत देण्यात येत असल्याने नागरिक स्वयंस्फूर्तीने कर भरण्यासाठी महापालिकेकडे धाव घेतात. मात्र कोरानाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने चलन देण्याची व घरपट्टी भरून घेण्याची प्रक्रिया पूर्णता बंद ठेवण्यात आली आहे. तसेच घरपट्टी भरण्यासाठी व पाच टक्के कर सवलत देण्यासाठी दि.31 मे पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा नगरविकास खात्याने केली होती. पण लॉक डाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने कर भरून घेण्याकरिता बेळगाव-वन आणि महापालिका कार्यालयात अद्यापही सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे चलन कोण देणार आणि घरपट्टी कुठे भरायची ? असा प्रश्न मालमत्ताधारकांना समोर निर्माण झाला आहे.
डेबीट व पेडीट कार्डद्वारे ऑनलाइन किंवा पेटीएम द्वारे घरपट्टी भरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. पण ऑनलाइन द्वारे घरपट्टी भरल्यास एसएमएस द्वारे घरपट्टी भरल्याची पोचपावती मिळते. पण सदर पावती काही दिवसातच खराब होते. सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामाकरिता घरपट्टी भरणा केलेली पावती जोडण्याची सूचना केली जाते अशावेळी ऑनलाइन द्वारा घरपट्टी भरलेली पावती दिल्यास स्वीकारली जात नाही. त्यामुळे नागरिकांची अडचण होते. याकरिता बहुतांश मालमताधारक बेळगाव-वन किंवा महापालिका कार्यालयात घरपट्टी भरणा करून पावती घेतात. ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली असली तरी नागरिकांना अडचणीची ठरली आहे. शहरात विविध कार्यालय आणि व्यवसाय सुरू झाले असल्याने बेळगाव-वन सुरू करण्यात कोणती अडचण आहे, अशी विचारणा नागरिक करीत आहेत. बेळगाव-वन आणि महापालिकेत घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.