सुरक्षा विभागाच्या सहआयुक्तांनी केली पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेंगळूर येथील ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्मयुरिटीचे सहआयुक्त राजीवकुमार राय यांनी नुकतीच बेळगाव विमानतळाला भेट दिली. विमानतळ परिसरात होणाऱया फ्लाईंग स्कूलच्या जागेची त्यांनी पाहणी केली. तसेच बेळगाव विमानतळावर सुरक्षेची सर्व ती खबरदारी घेतली जात असल्याचे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले.
विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राजीव कुमार राय यांनी विमानतळावरील सर्व महत्त्वाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन सूचना केल्या.