क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
एमएच बॉईज क्रिकेट क्लब आयोजित राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज चषक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव वॉरियर्स संघाने दावणगिरी संघाचा 9 गडय़ानी पराभव करून विजेतेपद पटकाविले. राहुल कदमला मालिकावीर तर अमर कोकरेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेत सकाळच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दावणगिरी संघाने उडुपी संघाचा 30 धावानी पराभव केला. या सामन्यात स्वप्नीलाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. दुसऱया उपांत्य सामन्यात बेळगाव वॉरियर्स संघाने मंगळूर संघाचा 60 धावानी पराभव केला. या सामन्यात राहुल कदमने 24 चेंडूत 80 धावा करून सामनावीर पुरस्कार पटकाविला.
अंतिम सामन्यात विजय जाधव यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. दावणगिरी संघाने 6 षटकात 6 बाद 39 धावा केल्या. प्रवीणने 16 धावा केल्या. बेळगावतर्फे अमर कोकरेने 9 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल बेळगाव वॉरियर्सने 4 षटकात 1 बाद 43 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. अक्षय गायकवाडने 23 धावा केल्या
बक्षिस वितरण आमदार अनिल बेनके, विजय जाधव, रोहन जुवळी, निशा पाटील, नंदकुमार महाजन, नितीन जाधव, संतोष कदम, आनंद काकडे, संजय जाधव यांच्या हस्ते विजेत्या बेळगाव वॉरियर्स, उपविजेत्या दावणगिरी संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर अमर कोकरे, मालिकावीर राहुल कदम, उत्कृष्ट फलंदाज स्वप्निल दावणगिरी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सुजित शिंदोळकर, सदानंद सोगावत, तर स्कोअरर म्हणून रवि कणबर्गी, समालोचन प्रमोद जपे व युवराज जाधव यांनी केले.