25 हजार जणांनी पूर्ण केले 28 दिवसांचे क्वारंटाईन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील 25 हजारहून अधिक जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. एकूण बाधितांच्या आकडय़ाने 2500 चा टप्पा पार केला असून सोमवारी आणखी 266 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये मात्र 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व तालुक्मयातील 88 जणांचा यामध्ये समावेश आहे. केवळ शहर व उपनगरांमध्ये 78 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर तालुक्मयातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. लक्षणे नसणाऱयांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत असून उर्वरित रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
सदाशिवनगर, आंबेडकरनगर, कुमारस्वामी लेआऊट, शिवबसवनगर, वडगाव, टिळकवाडी, उचगाव, कचेरी गल्ली-शहापूर, वैभवनगर, अंजनेयनगर, होसूर, अन्नपूर्णावाडी, कॅम्प, वीरभद्रनगर, संगमेश्वरनगर, सिद्धार्थनगर, कोतवाल गल्ली, सुभाषनगर, सुळगा-हिंडलगा, जालगार गल्ली, शाहूनगर, श्रीनगर, ओमनगर, मारिहाळ, गणेशपूर, भाग्यनगर येथील बाधितांचा यामध्ये समावेश आहे.
प्रशासनाला आणखी 1801 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 1801 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या 38 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 705 जण बरे झाले आहेत. तर 2500 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्हय़ातील 41 हजार 469 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 9 हजार 325 जण 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 40 हजार 173 जणांची स्वॅब तपासणी झाली असून 35 हजार 332 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटल व वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये सध्या 1600 हून अधिक बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत.
पोलीस, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, कापड दुकानदार, किराणा दुकानदार असे आता सरसकट अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बँक कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आवारातील सिंडीकेट बँक कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने बँक सीलडाऊन केली आहे.
गेल्या 24 तासांत एकूण 9 जणांचा मृत्यू
दरम्यान गेल्या 24 तासांत एकूण 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटिनमध्ये मात्र सहा मृत्यूचा उल्लेख आहे. चिकोडी तालुक्मयातील 73 वषीय वृद्ध, गोकाक तालुक्मयातील 75 वषीय वृद्धा, बेळगाव तालुक्मयातील 70 वर्षीय वृद्धा, सौंदत्ती तालुक्मयातील 63 वषीय वृद्धा, खानापूर तालुक्मयातील 70 वषीय वृद्ध व बेळगाव तालुक्मयातील 55 वर्षीय इसमाचा यामध्ये समावेश आहे.
महांतेशनगर येथील 74 वषीय वृद्ध, अनगोळ येथील 45 वषीय रहिवाशाचाही मृत्यू झाला असून उर्वरित मृतांचा तपशील उपलब्ध झाला नाही. यापैकी बहुतेक मृतदेहांवर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हेल्थ बुलेटिनमधील माहितीनुसार जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनामुळे 52 जणांचा बळी गेल्याचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा 100 हून अधिक असल्याची माहिती मिळाली आहे.
अथणी, चिकोडी, बैलहोंगल, गोकाक, सौंदत्ती, रामदुर्ग, रायबाग, खानापूर तालुक्मयातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील बाधितांचा आकडा मोठा आहे. तर सोमवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील चारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.