शहरासह तालुक्यात शुकशुकाट : गल्लोगल्ली झळकले निषेधाचे फलक, शहरात कडेकोट बंदोबस्त
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्या दरम्यान कन्नड संघटनेच्या म्होरक्मयाकडून मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेचे पडसाद सोमवारी दिवसभर उमटलेच तसेच मंगळवारी बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्मयासह सीमाभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठी भाषिकांवरील अत्याचाराविरोधात नागरिकांनी बंद पाळून आपला निषेध व्यक्त केला. यामुळे अधिवेशन सुरू असतानाही सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.
विविध संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी सकाळपासून बंदला सुरूवात झाली. शहर तसेच उपनगरांमध्ये बंद असल्याने शुकशुकाट पहायला मिळाला. दुध व वृत्तपत्र विपेते यांच्या व्यतिरिक्त इतर वर्दळ पूर्णपणे ठप्प होती. शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱया मारूती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड, रविवार पेठ, कलमठ रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, काकतीवेस परिसर यासह शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी, उद्यमबाग, महाद्वाररोड या परिसरामध्ये बंदमुळे शुकशुकाट होता.
बापटगल्ली व्यापाऱयांनी बंद केली दुकाने
बेळगावमधील इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ अशी ओळख असणाऱया बापटगल्ली येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठी भाषिकांसोबतच इतर भाषिकांनीही आपली दुकाने बंद ठेवत मराठीला सहकार्य केले. बापटगल्ली येथील फलकांवर निषेधाचा मजकूर लिहिण्यात आला होता. बेळगाव हे मराठी भाषिकांचेच असून, त्यावर हक्क हा त्यांचाच आहे. हे पुन्हा एकदा गल्लीतील नागरिकांनी दाखवुन दिले. एरवी गजबजणारी बापटगल्ली मंगळवारी दिवसभर मात्र शांततेत होती.
पांगुळगल्ली येथील व्यवहार ठप्प
शहरातील महत्वाची होलसेल साहित्याची बाजारपेठ असणाऱया पांगुळगल्ली येथील मंगळवारी सकाळपासून बंद पाळण्यात आला. व्यापाऱयांनी दुकाने बंद ठेवत शाई फेकीचा निषेध व्यक्त केला. दुकाने बंद असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरीकांना माघारी फिरावे लागले. एरवी गर्दीने फुललेली पांगुळगल्लीत मंगळवारी शुकशुकाट होता. स्थानिक व्यापाऱयांसह इतर व्यापाऱयांनीही या बंदसाठी सहकार्य केले.
रविवारपेठेतील दुकाने बंद
रविवारपेठेतील होलसेल मार्केट मंगळवारी बंद होते. मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने काही दुकाने बंद ठेवली जातात. परंतु बंदला सहकार्य करत रविवारपेठेतील व्यापाऱयांनी मंगळवारी आपली दुकाने बंद ठेवली. यामुळे रविवार पेठ येते शुकशुकाट दिसून आला. व्यापाऱयांनी दुकाने न उघडता घरीच राहणे पसंत केले. रविवारपेठ येथे अनेक मराठी व्यापारी असल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहापूर खडेबाजारात शुकशुकाट
मराठी बहुल भाग असणाऱया शहापूरमधील सर्रास भागात मंगळवारी शुकशुकाट होता. खडेबाजार शहापूर येथील अधिकतर दुकाने बंद होती. सराफी पेढीसह इतर दुकानेही बंद असल्याचे दिसून आले. व्यापाऱयांनी दुकाने बंद करून घरीच राहणे पसंत केले. शहापुर भागात अनेक मराठी व्यापारी असल्यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आला. दुकाने बंद असल्याने अत्यंत कमी रहदारी दिवसभरात दिसून आली.
उद्यमबागमधील कारखान्याची धडधड थांबली
उद्यमबागमधील कामगार तसेच कारखानदारांनीही घडलेल्या घटनेचा निषेध करत बंद पाळला. यामुळे उद्यमबागमधील बऱयाच कारखान्यांची धडधड मंगळवारी थांबली होती. उद्यमबागसोबतच मजगाव, अनगोळ, मच्छे, नावगे, या परिसरातील लहान कारखाने बंद होते. कामगारांनी भाषिक न्यायासाठी एक दिवस बंद पाळत आपला निषेध व्यक्त केला.
गल्लोगल्ली झळकले निषेधाचे फलक
कन्नड संघटनांनी दीपक दळवी यांच्यावर शाई फेक केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी गल्लोगल्ली निषेध व्यक्त केला. काही मंडळांनी आपल्या फलकांवर या घटनेचा निषेध करत बंदला पाठिंबा दिला. बापटगल्ली कालिकादेवी युवक मंडळ, गोवावेस रामलिंगवाडी युवक मंडळ, कोरेगल्ली गणेशोत्सव मंडळ, पाटील गल्ली वडगाव, कारभार गल्ली वडगाव यासह अनेक गल्लीच्या फलकांवर निषेधाचे मजकूर झळकले.
शहरात कडेकोट बंदोबस्त
दीपक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगावमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मराठी बहुल भागात तसेच प्रत्येक गावांमध्ये पोलिसांच्या गाडय़ा फिरत होत्या. एकत्र तरुण दिसून आले की, त्यांना हटकले जात होते. शहरातील प्रत्येक कोपऱयाकोपऱयावर पोलिसांची वाहने लावण्यात आली होती.