बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाने बजावला होता. पाच दिवस की अकरा दिवसा हा सण साजरा करायचा, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने मंडप घालण्याची परवानगी उपलब्ध झाली नव्हती. पण संबंधित परिसराच्या पोलीस स्थानकात मंडप परवानगी देण्यासाठी अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावचा गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. प्रतिवषी अकरा दिवस गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रारंभी मंदिरांमध्ये गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, तसेच पाच दिवस हा सण साजरा करण्याची सूचना शासनाकडून करण्यात आली होती. पण काही ठिकाणी मंदिरे नसल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मूर्तीची प्रतिष्ठापना कुठे करायची? असा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे रस्त्यांवर मंडप घालण्यासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळे ठाम होती. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण झाला होता.
अशातच महापालिका निवडणुकीमुळे मंडप परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कोणती सुविधा उपलब्ध केली नव्हती. मात्र अखेरच्या क्षणी मंडप परवानगी देण्याकरिता संबंधित पोलीस स्थानकात काऊंटर सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस स्थानक | महापालिका कर्मचाऱयांचे नाव | मनपा वरिष्ठ अधिकारी |
टिळकवाडी | महादेव गुंजीगावी (9956692090) | गोपाल व्ही सुख्ते (7975282560) |
मार्केट | महांतेश नाईक (9886669962) | पी. बी. मेत्री ( 9482543710) |
खडेबाजार | रणजीत कोवाडकर (9036858200) | गजानन बेणगे ( 9902407544) |
उद्यमबाग | महावीर साखे (9481942748) | रमेश कोणी (9742709007) |
कॅम्प | अमित गंथडे (9886056388) | रंगस्वामी के. एस. (8618725894) |
माळमारुती | आण्णाप्पा नाईक (9740256290) | मंजुनाथ गडाद ( 8150085178) |
शहापूर | संतोष कांबळे (9740340171) | रवि मास्तीहोळी मठ (7760555850) |
एपीएमसी | नागेश कलपत्री (9481913117) | किरण मण्णिकेरी (9449731560) |