लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे सुरु असलेल्या लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रेकेट स्पर्धेत रविवारी बेळगाव स्पोर्टस् क्लब संघाने एसडीएस ए संघाचा 21 धावांनी पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. 49 धावा करणाऱया संचित सुतारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. हुबळी येथे घेण्यात आलेल्या या सामन्यात बेळगाव स्पोर्टस् क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. त्यात संचित सुतारने 6 चौकारांसह 49, वरदने 2 चौकारांसह 12 तर सुरबित भोसलेने 2 चौकारासह 10 धावा केल्या. एसडीएस ए संघातर्फे सम्राट पाटीलने 14 धावात 2, पृथ्वी करजगीने 15 धावात 2 तर अभिषेकने 1 गडी बाद केला.प्रत्त्युतरादाखल एसडीएस ए संघाचा डाव 29.3 षटकात सर्वबाद 102 धावांत आटोपला. त्यात यश के. 3 चौकारासह 24, अफ्रादसाद पी.ने 18, संकेत राठोडने 2 चौकारासह 13 धावा केल्या. बेळगाव स्पोर्टस् क्लब तर्फे वरदने 16 धावांत 2 तर जयशांत एस., ऋतुराज पी. एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संचित सुतारला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.