क्रीडा प्रतिनिधी :
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने धारवाड ब विभागीय वरि÷ाच्या लेदरबाल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने श्री सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब संघावर 207 धावांनी दणदणीत विजय मिळविला. बेळगाव स्पोटर्स क्लबचा अमर घाले यांने दमदार फटकेबाजी करताना शानदार शतक नोंदविले. तर वेगवान गोलंदाज रोहित ढवळे यांने 37 धावात 6 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
बेळगाव स्पोर्ट्स क्लब :48.4 षटकात सर्वबाद 292 धावा (वेंकटेश शिराळकर 22, अमर घाळे 109, प्रशांत. एम 22, सोमनाथ एम. 34, आकाश कटांबळे 22, रोहित ढवळे 17 धावा श्री सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लबतर्फे संतोष आय. 2, किरण विटी 2, यल्लाप्पा के.2, विद्या सागर 2 बळी )
श्री सिध्दारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब : 13.3 षटकात सर्वबाद 85 धावा (बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे रोहित ढवळे 5 ,प्रशांत 3, शुभम गौंडाडकर 2 बळी)