केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागिय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लब सी संघाने युवराज स्पोर्ट्स क्लबचा 6 गडय़ांनी, सिग्नेचर संघाने रॉजर संघाचा 5 गडय़ानी, विलास बेंदे अकादमी धारवाड संघाने कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा 16 धावानी तर तानाजी स्पोर्ट्स अकादमी हुबळी संघाने हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाचा 2 गडय़ानी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. अश्पाक मलिक (तानाजी), वेदांत पाटील (बीएससी), यासीर निहाल (विलास बेंदे), रामनाथ काळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युवराज स्पोर्ट्स क्लब संघाने 28 षटकात 6 बाद 153 धावा केल्या. प्रसाद मोरेने 45, कल्पेश संबरगीने 26, राहुल शिंदेने 14, जोतिबा गिलबिलेने 12 धावा केल्या. बीएससीतर्फे वेदांत पाटीलने 16 धावात 4, प्रमोद असलकरने 98 धावात 2 तर अथर्व नुलीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससीने 26 षटकात 4 बाद 159 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. आशिष मंडोळकरने 63, प्रमोद असलकरने नाबाद 47, तर प्रवीण कुराडेने नाबाद 10 धावा केल्या. युवराजतर्फे किरण तरळेकर, जोतिबा गिलबिले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात रॉजर संघाने 28 षटकात 9 बाद 185 धावा केल्या. शंकर टी.ने नाबाद 50, श्रीकांत मरूचेने 39, इनायत मुजावरने 15, आनंद मेणसेने 13 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे विनायक एस व विठ्ठल दुर्गाई यांनी प्रत्येकी 3, आर. सिद्दलिंगने 2, रामनाथ काळेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर संघाने 25.4 षटकात 5 बाद 187 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. रामनाथ काळेने 52, संतोष चव्हाणने 45, सुरज तलवारने 28, अमरदीप पाटीलने नाबाद 27, रामकृष्ण एस.ने नाबाद 16 धावा केल्या. रॉजरतर्फे स्वयं पाटीलने 2, रवळु पाटील, सचिन कोनूर, दिनेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद
केले.
हुबळी येथील केएससीए मैदानावर विलास बेंदे क्रिकेट अकादमी धारवाड संघाने 30 षटकात 6 बाद 209 धावा केल्या. यासिर निहालने 74, बसवराज हेब्बाळेने 42, अरूण एस.ने नाबाद 36, आनंद पाटीलने 20 धावा केल्या. कर्नाटक स्टार हुबळीतर्फे शरणयू दनगीने 2 तर जैनुद्दीन, अरूण नायर, इम्रान, रिहान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटक स्टार हुबळी संघाने 30 षटकात 8 बाद 193 धावाच केल्या. महंमद रेहान कित्तुरने 54, अजमलराज शेखने 44, हर्षद अलीने 37, उमर अहमदने 19 धावा केल्या. बेंदे धारवाडतर्फे बसवकाई, संदीप, यासिर यांनी प्रत्येकी 2 तर श्रेयांशू व अरूण एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद
केला.
दुसऱया सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब सी संघाने 27 षटकात सर्व बाद 142 धावा केल्या. इस्माईल पी. ए.ने 57, प्रथम भोसलेने 25, विशालने 16 धावा केल्या. तानाजी स्पोर्ट्स हुबळीतर्फे रफीक शेखने 3, दिलीप मानेने 2, इरफान खानने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्स अकादमी हुबळी संघाने 23 षटकात 8 बाद 143 धावा करून सामना 2 गडय़ांनी जिंकला. अश्पाक मलिकने 73, रफिक शेखने 21 धावा केल्या. हुबळीतर्फे सुनीलकुमारने 4, इस्माईलने 2, साईप्रसादने 1 गडी बाद केला.