प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव व हुक्केरी तालुक्मयातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्य आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली असून एकूण बाधितांची संख्या 257 वर पोहोचली आहे. तर शनिवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या पाच जणांमध्ये अलतगा येथील एका तरुणाचा समावेश आहे.
शनिवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गुजरातमधून आलेल्या दोघा जणांसह महाराष्ट्रातून बेळगाव व हुक्केरी तालुक्मयात परतलेल्या चौघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोप्पळ जिल्हय़ातील एक 40 वषीय युवक अहमदाबादहून बेळगावला आला होता. त्याला संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.
आरोग्य विभागाने 3 जून रोजी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेले 35 वषीय युवक, दहा वर्षाचे बालक, 8 वर्षाची बालिका व गुजरातहून आलेल्या 23 वषीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुजरातमधून परतलेले दोघे जण व महाराष्ट्रातून परतलेल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व पाच जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान उपचारानंतर बरे झालेल्या अथणी, चिकोडी, बेळगाव, हुक्केरी, निपाणी परिसरातील 27 जणांना शनिवारी घरी पाठविण्यात आले आहे. हेल्थ बुलेटिनमध्ये याचा उल्लेख नसला तरी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील एकूण 14 हजार 632 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 5 हजार 93 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 153 वर पोहोचली आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 111 बाधितांवर उपचार करण्यात येत आहे.
505 अहवाल निगेटिव्ह आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत बेळगाव जिल्हय़ातील 505 संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर प्रशासनाला आणखी 331 अहवालांची प्रतीक्षा आहे. मुंबईहून परतलेल्या एका चाकरमान्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची अफवा पसरली होती. मात्र त्याचा अहवाल