उपाध्यक्षपदी बाळकृष्ण लोहार विजयी, निवडणूक चुरशीने : ग्राम पंचायतीत पहिल्यांदाच मोठे सत्तांतर : भाजपचे वर्चस्व
वार्ताहर / किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागातील बेळगुंदी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी चुरशीने झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी हेमा सुभाष हदगल यांनी 11 मते घेऊन बाजी मारली तर सोनोली गावातील बाळकृष्ण लोहार यांची उपाध्यक्षपदासाठी निवड झाली.
बेळगुंदी ग्रामपंचायतमध्ये एकूण 19 सदस्य आहेत. निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी हेमा हदगल व गीता ढेकोळकर यांचे अर्ज दाखल झाले. हदगल यांना 11 मते मिळाली तर गीता ढेकोळकर यांना 8 मते मिळाली. तीन मतांनी हेमा हदगल विजयी झाल्या. तसेच उपाध्यक्षपदासाठी असलेल्या दोन उमेदवारांमध्ये रेहमान ताशिलदार यांना 8 मते मिळाली तर बाळकृष्ण लोहार यांना 11 मते मिळाली.
बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या राजकारणात पहिल्यांदाच इतके मोठे सत्तांतर झाले आहे. यापूर्वी बेळगुंदी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता होती. यावेळी मात्र भाजपने बाजी मारली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी होते. तसेच पीडीओ कविता याही उपस्थित होत्या.
‘तरुण भारत’ला सदिच्छा भेट
बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा हेमा हदगल व उपाध्यक्ष बाळकृष्ण लोहार यांनी गुरुवारी ‘तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘तरुण भारत’चे संस्थापक स्वर्गीय बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रा. पं. सदस्य महादेव पाटील, रवळू पाटील, कल्लाप्पा ढेकोळकर, प्रताप सुतार, सुमन गावडा, दीपा लोहार, शीतल सुतार, सरिता तळवार आदींसह सुभाष हदगल, यल्लाप्पा पाटील, सूर्यकांत चौगुले, शिवाजी मुतगेकर, मल्लाप्पा कडोलकर, गुणवंत सुतार, चांगदेव पाटील, उदय सुतार, बसू कणबरकर, विश्वनाथ चव्हाण, गौतम भडांगे, रवळू गावडा, नाना कंग्राळकर, बळवंत लोहार आदी उपस्थित होते.
बेळगुंदी ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच प्रशासनामार्फत मिळणाऱया विविध योजना ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात येणाऱया गावांमध्ये राबविणार आहे. तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षा हेमा हदगल व उपाध्यक्ष बाळकृष्ण लोहार यांनी ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.