सभासदांना 20 टक्के लाभांश देणार
किणये : बेळगुंदी येथील रविकिरण सोसायटीची 25 वी वार्षिक सर्वसाधारणसभा संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीत झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन यल्लाप्पा बेळगावकर होते.
सोसायटीला 8 लाख 52 हजार रुपयांचा नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती यल्लाप्पा बेळगावकर यांनी दिली.
नानासाहेब पाटील, ऍड. नामदेव मोरे, बाळू उच्चुकर, रवळू बेटगेरीकर, वसंत अष्टेकर, अब्दुल नावगेकर, परशराम गावडे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सोमाण्णा गावडा यांनी केले. मागील बैठकीचे प्रोसिडिंग भावना दातार यांनी वाचून दाखविले. नफा तोटा पत्रकाचे वाचन सेक्रेटरी परशराम गायकवाड यांनी केले. प्रार्थना शिंदे यांनी नफा विभागणी याबाबतची माहिती दिली. तेजस्विनी सुतार यांनी अंदाजपत्रक सादर केले.
चर्चेमध्ये मारुती शिंदे, अशोक गावडा, महादेव हिंडलगेकर यांनी भाग घेतला. त्यांना म्हात्रू झंगरुचे व परशराम कांबळे यांनी समपर्क अशी उत्तरे दिली. परशराम पाटील यांनी आभार मानले. संचालक मंडळ, कर्मचारी, पिग्मी कलेक्टर व भागधारक आदी सभेला उपस्थित होते.