कणकवली:
बेळणे खुर्द येथे आपसात झालेल्या मारहाणीबाबत परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसऱया बाजूने सचिन भिकाजी तोडणकर (32, बेळणे खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र बापू बिरवाडकर, संतोष बापू बिरवाडकर, लक्ष्मण दत्ताराम तोडणकर, किशोर दत्ताराम तोडणकर (सर्व रा. बेळणे खुर्द) या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन तोडणकर हे रविवारी सायंकाळी 7 वा. सुमारास राहत्या घरामागे सहाआसनी रिक्षा पार्किंग करताना संशयितांनी तेथे येत सचिन यांना शिवीगाळ करीत, हाताच्या ठोशाने, दांडय़ाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कासार्डे दूरक्षेत्राचे हवालदार नितीन खाडे करीत आहेत. दरम्यान, यापूर्वीच राजू बिरवाडकर यांच्या फिर्यादीनुसार सचिन तोडणकर व सुनील तोडणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.