प्रतिनिधी / बेळगाव
व्हॅक्सिन डेपो मैदानाजवळ बेवारस कार मागील अनेक दिवसांपासून उभी करण्यात आली होती. यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होत असल्याने ती हटविण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु, शुक्रवारी या कारचे स्क्रॅप करण्यात आल्याचे दिसून आले. परंतु, याबाबत स्थानिक नागरिकांनाही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
के. ए. 52- 4926 या क्रमांकाची कार व्हॅक्सिन डेपो परिसरात उभी करण्यात आली होती. बेवारस स्थितीत असणाऱया या कारच्या काचा फुटल्या होत्या. या कारच्या बाजूला कचरा फेकण्यात येत असल्याने ती हटविण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर शुक्रवारी ही कार स्क्रॅप करण्यात आली.