प्रतिनिधी / सांगली
सांगली-मिरज-कुपवाड शहरामध्ये महापालिकेच्यावतीने बेवारस वाहनांच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून आत्तापर्यंत महापालिकेकडून ८१ बेवारस आणि विनावापरात असणारी वाहने जप्त करण्यात आली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही मोहीम सुरू असून दोन दिवसात जप्त केलेली वाहने दंड भरून न नेल्यास सदरच्या वाहनांचा लिलाव काढण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.