बेंगळूर येथील कार्यक्रमात करण्यात आला गौरव : अन्य अधिकाऱयांनाही पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयात दक्ष अधिकारी म्हणून काम केलेल्या मल्लिकार्जुन कलादगी यांचा नावलौकिक होता. त्यामुळे त्यांचे कार्य पाहून त्यांना राज्यातील बेस्ट कार्यकारी अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. 2021-22 सालच्या महात्मा गांधी राष्ट्रीय उद्योग खात्री योजनेचा राज्य प्रमाणपत्र पुरस्कार सोमवार दि. 14 रोजी बँक्वेट हॉटेल, विधानसौध, बेंगळूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना देण्यात आला.
कलादगी यांनी बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये उद्योग खात्रीतून विकास साधला आहे. त्यांनी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे आहे. परिणामी अनेक गावांत पाणीपातळीत वाढ करण्यासाठी त्यांनी उद्योग खात्री योजनेतून तलाव खोदून पाणीसाठा करण्यावर भर दिला. त्यामुळे त्यांना पुस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ते सध्या बदामी येथे कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी त्यांचा गौरव करण्यात आला.
ग्रा. पं.-ता. पं. अधिकाऱयांचा गौरव
मल्लिकार्जुन कलादगी यांच्याबरोबरच पुष्पा कम्मार (ता. सागर, जि. शिमोगा), नयन एस. (ता. नरसिंहराजपूर, जि. चिक्कमंगळूर), सोमशेखर बिरादार (ता. कुकनूर, जि. कोप्पळ) यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य पातळीवरील उद्योग खात्री तसेच इतर योजनांतर्गत काम करणाऱया ग्राम पंचायत तसेच तालुका पंचायतच्या अधिकाऱयांचा गौरव करण्यात आला. कलादगी यांच्या कार्याची दखल राज्य सरकारने घेऊन त्यांना पुरस्कार दिला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. चिकोडी तालुक्मयातील साहाय्यक सचिव शिवानंद शिरगावी यांनाही उत्तम कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा, एल. के. अतिक यांच्या हस्ते मल्लिकार्जुन कलादगी यांचा गौरव करण्यात आला.