वार्ताहर/ कराड
शनिवार पासुन पुन्हा सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. सोशल मिडीयावरही नाराजीच्या पोस्ट पडत आहेत. शुक्रवारी संध्याकाळनंतर शहरातील व्हॉटसप गृपवर नाराज व्यपाऱयांनी लॉकडाऊनसंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता चावडी चौकात व्यापाऱयांची बेठक घेण्याची ठरवले मात्र याबाबत माहिती मिळताच सकाळी चावडी चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
जवळपास दिड वर्षांपासुन सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील सर्वच व्यपारी वैतागले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासुन लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्याने उद्योग व व्यवसाय पुर्वपदावर येत होते. अशातच कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सातारा जिलह्यात शनिवार पासुन पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील उद्याग व्यवसाय वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे शहरातील व्यपाऱयांत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
निवडणुकांत सुट व निवडणुका झाल्या की पुन्हा लॉकडाऊन अशा अशयाच्या पोस्ट सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत. शहरासह तालुक्यातुन वारंवार होणाऱया लॉकडाऊनला व्यपारी वर्गातुन विरोध होऊ लागला आहे. याचाच प्रत्यय श्क्रवारी हॉटसप गृपवर आला. लॉकडाऊनमुळी नाराज झालेल्या व्यपाऱयांनी लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता चावडी चौकात व्यपाऱयांची बैठक बोलावण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत चर्चा करून लॉकडाऊन बाबत पुढील दिशा ठरवण्यात येणार होती. मात्र याबाबत माहिती मिळताच चावडी चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर विकेंड लॉकडाऊन असल्याने सर्व व्यपारी व नागरीकांनी रस्त्यावर थांबु नये असे आवाहन करण्यात आले. यामुळे ही बेठक होऊ शकली नाही.